मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीत गोंधळ घालून पोलिस शिपायाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष विठ्ठल खंकाळ (वय ५३, रा.लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस शिपाई प्रशांत तुर्डे यांनी फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गाडीतळ पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आरोपीला १४ मार्च रोजी दुपारी बोलावून घेतले होते. ‘तू मला बोलावून घेतले. तू साधा पोलिस शिपाई आहे. तुला तपासाचा अधिकार नाही’, अशी अरेरावी करून आरोपीने पोलिस शिपाई तुर्डे यांच्याशी वाद घातला.तुर्डे यांना धक्काबुक्की करण्यात आली.
तर, चैाकीच्या आवारात गोंधळ घातला. ‘तुझ्याविरुद्ध माझ्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. तू मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवतो. तुझी तक्रार पोलिस आयुक्तांकडे करून नोकरी घालवतो’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रणिल चौगले करत आहेत.












