घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नगर रोड परिसरात महापालिकेची धडक कारवाई

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून नगर रोड परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता लोहगाव व खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम राबवण्यात आली.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई उप आयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार आणि महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. या मोहिमेत बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता सौरभ खरात उपस्थित होते.

कारवाईदरम्यान एकूण सुमारे १०,००० चौरस फूट क्षेत्रातील कच्चे व पक्के शेड तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सकाळी लवकर सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या मोहिमेसाठी महापालिकेचे २० पोलीस कर्मचारी, एमएसएफचे ५० जवान, ६ जेसीबी, २ गॅस कटर, ४ ब्रेकर तसेच ६ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि २० बिगारी सेवक यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

महापालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले असून, नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें