;महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमुळे लोणीकंद परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर १८ ते २२ मार्च या कालावधीत दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने येणार असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस, तसेच जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टरसारखी अशा अवजड वाहनांचा समावेश आहे.
लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गासह उपरस्त्यांवरही अवजड वाहनांची वाहतूक आणि रस्त्याच्या कडेला अशा वाहनांचे पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.












