घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

घोडनदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटले

काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटल्याने बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या कठड्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे यांनी केली आहे.

येथील बंधारा तालुक्याच्या पूर्वभागातील सर्वात मोठा व जुना बंधारा आहे. घोडनदीच्या दक्षिणेला काठापूर बुद्रुक व उत्तरेला शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द हे गाव आहे. या बंधाऱ्यावरून दोन्ही गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात शेतातील मशागतीसाठी जाण्यासाठी किंवा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर केला जातो.

भीमाशंकर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या टायरगाड्या या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर जात असतात. सध्या बंधारा पाण्याने तुडूंब भरला आहे.

गेली अनेक महिन्यापासून बंधाऱ्याच्या लोखंडी संरक्षक कठड्याचे अनेक ठिकाणी पाइप तुटल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याचा धोका असल्याने तातडीने बंधाऱ्याच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरीत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें