घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात MPSC, UPSC विद्यार्थ्यांची उपासमार; ‘इडली’वर भागवावी लागतेय भूक

पुण्यातील स्पर्धा परीक्षेचे केंद्र असलेल्या सदाशिव पेठ परिसरात सध्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरचा पुरवठा अचानक खंडित झाल्याने पेठेतील छोटी-मोठी हॉटेल्स आणि खानावळींचे टाळे ठोकण्याची वेळ आली आहे.

याचा सर्वाधिक फटका सकाळी नाश्ता करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या खानावळी आणि नाश्त्याची हॉटेल्स एकामागून एक बंद पडू लागली आहेत.विद्यार्थ्यांचे हाल आणि ‘इडली’चा आधारसदाशिव पेठ, शनिवार पेठ आणि नवी पेठ परिसरात हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहतात. पोहे, उपमा, वडा-पाव किंवा गरमागरम चहा देणारी छोटी हॉटेल्स गॅस नसल्याने बंद झाली आहेत. हॉटेल मालकांनी ‘गॅस संपला आहे’ असे बोर्ड लावले आहेत.

पुरवठा का खंडित झाला?

गॅस एजन्सीकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. व्यवसाय बंद राहिल्याने या छोट्या व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. एलपीजी गॅस पुरवठा पूर्ववत व्हावा आणि दोन घास वेळेवर मिळावे अशी आशा आता स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें