घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु आहे. रविवारी पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लक्झरी बस आणि चारचाकी कारमध्ये झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पुणे- नाशिक महामार्गावर अपघातयाबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंद्रप्रस्थ पेट्रोल पंपासमोर एका लक्झरी बस आणि चारचाकी कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

संबंधित लक्झरी बसही पुण्याहून धुळ्याकडे जात होती, तर चारचाकी कार नाशिकहून पिंपरी-चिंचवडकडे येत होती. याचदरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 42), मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (वय 46) आणि लता बाळू तूपलोंडे (वय 63) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 16) आणि प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 20) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एकाच घरातील तिघांचा मृत्यूअपघातातील सर्वजण पिंपरी-चिंचवड येथील वाल्हेकर वाडी परिसरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें