फूलबाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्या तुलनेत मागणी कमी आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे :
झेंडू : १०-२०, गुलछडी : १००-१५०, अॅष्टर : जुडी : १०-२०, सुट्टा : १००-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ५०-१२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-२५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : ५०-६०, लिली बंडल : ८-१०, मोगरा : ३००-५००.












