घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व सांस्कृतिक संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्यावतीने विमाननगर येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियममध्ये ‘मोगरा फुलला’विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण दादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अधीक्षक जानवी जानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.या सोहळ्यात गणेश शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ हे सादरीकरण सादर केले.

अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते. संत साहित्यावर आधारित या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाई उळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जानवी जानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें