घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

आकाशातून वाईचे दर्शन : महोत्सवात हॉट एअर बलून राईडचे आकर्षण

वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
वाई, दि. 26 : वाई येथे मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या वाई महोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असून, महोत्सवातील हॉट एअर बलून राईड हे वाईकर नागरिक व पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. माफक दरात उपलब्ध असलेल्या या राईडचा लाभ वाईकरांसह परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने घेत आहेत. वाई शहराचे नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वाई महोत्सवात पसरणी येथील जीपी ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच हॉट एअर बलून राईडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे नेतृत्व कंपनीचे मालक गोविंद येवले यांनी केले आहे.
महागणपती घाटासमोरील नाना–नानी पार्क येथे ही राईड सुरू असून, अत्यंत सुरक्षित वातावरणात व सर्व नियमांचे काटेकोर पालन करत ही सेवा दिली जात आहे.
विशेष म्हणजे, “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर ही राईड नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, साहसी पर्यटनाचा नवा अनुभव वाईकरांना मिळत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल सावंत व सौ. सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या हॉट एअर बलूनमधून सुमारे ४०० फूट उंचीवरून वाई शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळत आहे. कृष्णेच्या काठावर वसलेले वाई शहर, पुरातन मंदिरे, घाट, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गसौंदर्य यांचे मनोहारी दर्शन आकाशातून अनुभवताना पर्यटकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. “पक्षांच्या नजरेतून वाई पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे,” अशी भावना अनेक पर्यटक व्यक्त करत आहेत.
या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी व एनसीसी कॅडेट्स यांना विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती गोविंद येवले यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना साहसी खेळांची ओळख होण्यासोबतच सुरक्षित पर्यटनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाईकरांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच या महोत्सवात खाऊ गल्ली हेही प्रमुख आकर्षण ठरत असून, येथे चवीला रुचकर व विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
याशिवाय महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाईकर या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
या वाई महोत्सवाचा समारोप मंगळवार, दि. 27 जानेवारी रोजी होणार आहे.
एकूणच, हॉट एअर बलून राईडसह विविध उपक्रमांमुळे वाई महोत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले असून, वाईच्या पर्यटनमूल्यात लक्षणीय भर पडत आहे. नागरिक, पर्यटक व तरुणाईकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, येत्या काळात वाई हे पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें