अमर एज्युकेशन सोसायटी संचलित, एस. पी. इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव पठार, येथे 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ सोकांडे सर व संस्थापिका सचिव सौ. मंगलताई सोकांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे माननीय श्री राहुल खिलारे साहेब (भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक), माननीय श्री चेतन जी शर्मा (पोलीस तपासक निरीक्षक) , माननीय सौ. सीमा युवराज बेलदरे (नवनिर्वाचित नगरसेविका). माननीय रेळेकर सर ( स्कूल कमिटी चेअरमन) माननीय श्री वीर सर (पी.एस.आय.)हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले व उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचे मार्च पास संचलन मोठ्या शिस्तबद्ध व देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, कविता, गीते, नृत्य व लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अमर सोकांडे सर व मुख्याध्यापिका माननीय सौ पल्लवी अमर सोकांडे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होण्याच्या आवाहन केले.
कार्यक्रम शिक्षक वृंद ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यात आले.











