घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, २ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं

आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक यांना ५० हजार रुपयांची लाच प्रकरणी मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिकाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन लाच कुठल्या कारणासाठी स्विकारली याबाबत अद्याप स्पष्ट नसुन मंचर पोलीसांत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.आंबेगाव जुन्नरचे प्रांत कार्यालय असणाऱ्या मंचर येथे प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांनी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (२७ मार्च रंगहात पकडले.

सापळा रचून प्रांताधिकाऱ्यांना बेड्यामंचर प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आलीय. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिक राहुल खैरनार यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून मंचर पोलिसांत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात नारायणगाव येथील एका बिल्डरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि लिपिक राहुल खैरनार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुठल्या कारणासाठी लाच स्वीकारली याबाबत अद्याप स्पष्टता नसून मंचर पोलिसांत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

इमारतीच्या बांधकाम पूर्णत्व दाखल्यासाठी तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी शिंदे यांनी २ लाखांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB ने शुक्रवारी मंचर येथील प्रांत कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें