घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

3 सेकंदात मृत्यू पाहून माघारी परतला अन् देवासारख्या टीसीशी शेकहँड केला

रेल्वेनं प्रवास करत असताना दारात उभं राहू नका, धावत्या रेल्वेत चढू नका अथवा उतरू नका, असं आवाहन वारंवार केलं जात असतं, पण काही प्रवाशी जिवाची परवा न करता नको ते धाडस करत असतात.अशातच मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवर एक अशीच एक घटना घडली.

धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाने उतरण्याचा प्रयत्न केला पण तोल गेला आणि खाली पडला. रेल्वेखाली जाणार तेच स्थानकावर उभ्या असलेल्या टीसीने वाचवलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर २२ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली. रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका प्रवशाचा जीव वाचला. धावत्या युवा एक्सप्रेस मधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव बोरिवली स्थानकावरील तपासणी कर्मचाऱ्याने धाडस दाखवत वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, युव्हा एक्सप्रेस बोरिवली स्थानकावर थांबत नसताना एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही परिस्थिती पाहताच स्थानकावरील तपासणी कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत प्रवाशाला पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतलं.कर्मचाऱ्याच्या या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही त्याच्या धाडसाचे कौतुक केलं आहे.

रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेची नोंद घेत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे. तसंच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें