घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कामथडी–भोंगवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमदादा व तृप्तीताई खुटवड यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांकडून औक्षण करून स्वागत

भोर प्रतिनिधी : उमेश अहिरे

कामथडी–भोंगवली जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विक्रमदादा खुटवड आणि पंचायत समिती कामथडी गणाच्या उमेदवार तृप्तीताई खुटवड यांना प्रचारादरम्यान मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कापूरहोळ, मोहरी, कामथडीसह संपूर्ण मतदारसंघात महिला भगिनींनी औक्षण करत उमेदवारांचे जंगी स्वागत केले.

तब्बल बारा वर्षे सत्तेबाहेर असतानाही मतदारसंघातील जनतेचा विश्वास आणि प्रेम कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मोहरी (ता. भोर) येथे आयोजित कोपरा सभेला पंचक्रोशीतील आजी–माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, मंडळांचे अध्यक्ष, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना विक्रमदादा खुटवड म्हणाले,
“आज बारा वर्षांनंतर जनतेकडे मतांची मागणी करण्यासाठी आलो असतानाही घरोघरी पंचारतीने ओवाळून औक्षण केले जात आहे. जेष्ठ नागरिक आणि महिला भगिनी स्वेच्छेने पुढे येऊन आशीर्वाद देत आहेत, हे माझ्यासाठी मोठे बळ आहे.”

विरोधकांकडून त्यांच्या हक्काची तीन गावे दुसऱ्या वार्डमध्ये टाकण्यात आली असून सुमारे ४३०० मते वगळली गेली असली तरी त्यांनी यावर संयमित प्रतिक्रिया देत,
“मी त्यांना शुभेच्छा देतो. त्या भागात केलेली विकासकामे लोक आजही विसरलेले नाहीत. ही कामे विक्रमदादांनीच केली, असे लोक स्वतः सांगत आहेत,” असे नमूद केले.

“१२ वर्षे सत्तेबाहेर तरीही जनमत खुटवड यांच्याच पाठीशी; मोहरीतील कोपरा सभेत विक्रमी गर्दी!”

ते पुढे म्हणाले,
“तीन वेळा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी थांबलो. आता मला सुवर्णसंधी मिळाली आहे, त्यामुळे लढणे स्वाभाविक आहे. पक्षाने मला संधी दिली असून सर्वांनी कोणताही संकोच न ठेवता प्रामाणिक काम करावे. मी कधीही टोकाचे राजकारण, वैयक्तिक टीका किंवा दुजाभाव केला नाही; नेहमी विकासाचेच राजकारण केले आहे.”

दर गुरुवारी कापूरहोळ आणि मंगळवारी भोर येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित राहत असल्याचे सांगत,
“यापुढेही प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाणार आहे. या कठीण काळात आपण मला मतदानरूपी मदत करा; त्याची परतफेड विकासकामांतून नक्की करीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, या सभेदरम्यान परिसरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी विक्रमदादा खुटवड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे सभेला आणखी उत्साहाचे वातावरण लाभले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें