घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तहसील कार्यालयात दारूच्या नशेत गोंधळ; कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी

आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, घोडेगाव येथील अभिलेख कक्षामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुनील वसंत लोले (वय ३८, रा.जारकरवाडी, ता. आंबेगाव) यांच्याविरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल सहायक सचिन ओहळ यांनी याबाबत तक्रार दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास आंबेगाव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये लोले हे दारूच्या नशेत येऊन ७/१२ उतारा व फेरफार तत्काळ देण्याची मागणी करत मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते.

यावेळी त्यांनी महसूल सहायक सचिन ओहळ तसेच इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.ओहळ यांना जिवे मारण्याची धमकी देत अभिलेख कक्षातील टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सचिन ओहळ यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार लोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार हरिभाऊ नलावडे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें