बालाघाटहून इतवारीकडे ( नागपूर) येणारी मेमू गाडी रविवारी रात्री कळमना-कामठी दरम्यान रुळावरून घसरली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी तातडीने मदत पथक रवाना करून रुळ सुरक्षित करण्याचे काम सुरू केले. या अपघातामुळे काही स्थानिक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, इतर महत्त्वाच्या गाड्यांची वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने वळवण्यात आली. या गाडीतील दोन चाक रुळावरून घसरले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या. रात्र एकवीस वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली. गाडीचे दोन चाक रुळावरून घसरल्यामुळे तातडीने एसपीएआरएमई, अपघात निवारण ट्रेन (एआरटी) आणि वैद्यकीय मदत पथक (एआरएमई) रवाना करण्यात आले. एसपीएआरएमई रात्री एकवीस वाजून अठ्ठावीस मिनिटांनी तर एआरटी एकवीस वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी घटनास्थळी पोहोचली. प्रशासनाने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून रुळावर तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले.
वाहतुकीवर परिणामया अपघातामुळे अनेक गाड्या मार्गात अडकल्या. बिलासपूर-नागपूर, कोरबा-अमृतसर, हावडा-अहमदाबाद आणि इतर काही महत्त्वाच्या गाड्यांना नियोजित वेळेत पुढे जाण्यास विलंब झाला. काही गाड्या विविध स्थानकांवर थांबवल्या गेल्या. रेल्वे प्रशासनाने ‘पाइपलाईन’ तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियमनात ठेवली. प्रवाशांना सुरक्षिततेचा समज देत, गाड्यांची वेळेत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत देखरेख करत आहे.
अपघाताच्या परिस्थितीमुळे तीन स्थानिक मेमू सेवा रद्द करण्यात आल्या. यात ६८७१६ नागपूर ते गोंदिया, ६८७१२ गोंदिया ते दुर्ग आणि ६८७१० डोंगरगड ते रायपूर या गाड्याचा समावेश आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रशासनाने त्यांना तातडीने पर्याय उपलब्ध करून दिला.
रद्द केलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना थोडासा गैरसोय झाला, परंतु सुरक्षितता राखणे ही प्राथमिकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दुरुस्ती काम सुरू, वाहतूक लवकरच सुरळीतघटनास्थळी तांत्रिक पथक कामावर आहे. रुळ पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून, प्रशासनाच्या माहितीनुसार लवकरच वाहतूक पुन्हा सुरळीत होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अपघाताबाबत तातडीने माहिती मिळाल्यामुळे मोठ्या अनर्थ टाळता आला. प्रवाशांना सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनाचा उद्देश भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना राबवणे आहे.
प्रशासनाची सूचनाअपघातामुळे रद्द झालेल्या गाड्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. तसेच, रुळावरील दुरुस्ती पूर्ण झाल्यावर इतर गाड्यांची वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू होईल. प्रशासनाने अपघाताच्या वेळी संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, प्रवाशांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे असे सांगितले आहे.












