घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अशोक खरातला रुपाली चाकणकरांची होती साथ?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला अटक केल्यापासून त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. अनेक पीडित महिलांनी पोलिसांकडे धाव घेत अशोक खरातच्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे.

या प्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर देखील अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना राज्य महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

या सगळ्या घडामोडीनंतर आता रुपाली चाकणकर आरोपी अशोक खरातला त्याच्या वाईट कामांत साथ देत होत्या का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी नवा खुलासा समोर आला असून महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

अशोक खरातने अत्याचार केलेल्या एका तरुणीच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अशोक खरात सांगण्यावरून महिला आयोगानं सुनावणी सुनावणी ठेवली होती. याबाबत महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना देखील नोटीस देण्यात आली होती. १७ मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती.

मात्र या प्रकरणाचा तपास आधीच SIT कडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिला होता. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ५ आणि ९ मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र दिलं होतं. त्यामुळे शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात महिला आयोगाचा हस्तक्षेप होता, हे दिसून येत आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरचा पाय खोलात जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें