घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

हिंगे दांपत्याची कृषी अधिकारीपदी मोहर

अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील तेजश्री हिंगे व अक्षय नवनाथ हिंगे या दांपत्याची शासनाच्या कृषी विभागात अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने या दांपत्याचे कौतुक होत आहे.

१८ मार्च २०२६ ला तेजश्री यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये मंडळ कृषी अधिकारी राजपत्रित अधिकारी गट- ब या पदासाठी निवड झाली आहे. अक्षय हिंगे यांचीही मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.ते सध्या पाटण (जि. सातारा) येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा (अवसरी बुद्रुक) येथे झाले. माध्यमिक शिक्षण गावातीलच विद्या विकास मंदिर येथे झाले रत्नाई कृषी महाविद्यालय (अकलूज) येथून कृषी पदवीचे शिक्षण घेतले.

तेजश्री यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर (जाधववाडी, जि. कोल्हापूर) येथे तर माध्यमिक शिक्षण गर्ल्स हायस्कूल, (मलकापूर) येथे झाले. त्यांनी कृषी विभागाची पदवीचे बीएससी ॲग्रीचे शिक्षण कोल्हापूर शासकीय महाविद्यालयात घेतले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें