घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान

पुणे – दत्त परंपरेतील महान संत आणि शक्तिपात योगाचे अध्वर्यू प.पू. गुळवणी महाराज यांच्या दीक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठीचा हा सन्मान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला.

शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. पुण्यातील एरंडवणे येथील ‘श्रीवामन निवास’ येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव (२०२०-२०२६)’ हा दिमाखदार सन्मान सोहळा पार पडला. हा महोत्सव अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. श्रीवासुदेव निवास स्थापनेचा हीरक महोत्सव, प.पू. ब्रह्मश्री श्रीदत्त महाराज कवीश्वर पुण्यतिथी रौप्य महोत्सव, प.पू. योगतपस्वी श्रीनारायणकाका ढेकणे महाराज जयंती शताब्दी महोत्सव, विद्यमान उत्तराधिकारी पू. शरदभाऊ जोशी यांचा ‘योगभक्ती अमृत महोत्सव’ होता.

या प्रसंगी भारतभरातील २६ संतांचा सन्मान करण्यात आला. समाजाला सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करणाऱ्या सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत, या उदात्त हेतूने ‘श्री प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प.पू. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज ट्रस्ट’च्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उपस्थित संतांनी साधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण, पादुकापूजन आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने झाला. समारोप प.पू. टेंबे स्वामी विरचित ‘दत्त त्रिपदी’च्या व्हायोलिन वादनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री. शिरीषकुमार आणि श्री. अरुणकुमार उपाध्ये यांनी हे वादन सादर केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें