घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

VIT च्या विद्यार्थ्यांकडून ‘स्पंदन’ उपक्रमांतर्गत सिंहगड गडसंवर्धन व खडकवासला स्वच्छता मोहीम

पुणे, 30/03/2026 — विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटी अंतर्गत टीम स्पंदन तर्फे सिंहगड किल्ल्यावर गड संवर्धन मोहीम तसेच खडकवासला धरण परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले.या उपक्रमामध्ये 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून 25 पेक्षा अधिक पोते म्हणजेच 300+ किलो कचरा संकलित केला, ज्यामुळे ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.या उपक्रमाचे नेतृत्व सार्थक देशमुख आणि रुचिता बाबर यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने किल्ला व धरण परिसर स्वच्छ करत “आपला वारसा जपूया, पर्यावरण वाचवूया” हा संदेश दिला.

गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे व पराक्रमाचे जिवंत प्रतीक असून त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे हीच महाराजांना खरी आदरांजली असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या मोहिमेचा उद्देश तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची भावना निर्माण करणे हा होता.

VIT च्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.भविष्यातही Team स्पंदन तर्फे अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें