घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बारामतीत अवकाळी गारपीटीचा कहर; उभ्या पिकांची राखरांगोळी, शेतकरी आर्थिक संकटात

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ आदी भागांमध्ये आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि भीषण गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काही मिनिटांतच निसर्गाच्या या तडाख्याने उभ्या पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली असून शिवारात सर्वत्र हाहाकार माजला आहे.

केळी, आंबा, ऊस, चारा पिके तसेच पालेभाज्या यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके जमिनदोस्त झाली आहेत. गारांच्या माऱ्याने झाडांची पाने गळून पडली, तर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. शिवारात उभे असलेले हिरवेगार पीक क्षणात सपाट झाल्याचे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. वर्षभराच्या कष्टाचे स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक शेतकरी भावूक झाले.

“हातात आलेलं पीक गेलं, आता जगायचं कसं ?” असा हंबरडा अनेकांनी फोडला. आधीच वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या संकटाने आणखी घाव घातला आहे, अशी भावना निखिल धुमाळ यांनी व्यक्त केली.दरम्यान, या घटनेची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी प्रशासनाला तात्काळ हालचाली करण्याच्या सूचना दिल्या.

प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना बाधित शिवाराचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली असून, नुकसान भरपाईशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे बारामती तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें