घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चाकणमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे महिलांचा संताप

चाकण (ता. खेड) परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करून आठवडा उलटला तरी सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त महिला आणि कामगारांनी गॅस वितरण केंद्रावर रांगा लावून प्रशासनाचा निषेध केला.

चाकण औद्योगिक वसाहतीमुळे या भागात कामगार वर्गाची मोठी संख्या आहे. सध्या गॅस टंचाईमुळे या कुटुंबांचे स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले आहे. ‘भ्रमणध्वनीवर गॅस उपलब्ध असल्याचे संदेश येतात, मात्र प्रत्यक्षात वितरण केंद्रावर गेल्यावर गॅस मिळत नाही. तासनतास उन्हात उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे,” अशी तक्रार संध्या काळे आणि भाग्यश्री वासमणी या महिलांनी केली.

कामाचा खाडा करून कामगारांना गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. या टंचाईमुळे काही ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.औद्योगिक पट्ट्यातील लाखो कामगार पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहेत. सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेकांवर हॉटेलमधून जेवण आणण्याची किंवा बेकायदा मार्गाने महागडा गॅस खरेदी करण्याची वेळ आली आहे.

शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.वितरकाचे म्हणणे…एचपी कंपनीकडून होणारा पुरवठा मर्यादित असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तरीही आम्ही दररोज ३०० हून अधिक ग्राहकांना सिलिंडर देत आहोत. जशा गाड्या उपलब्ध होतील, तसे बुकिंगनुसार वितरण केले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें