घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जन्मदात्या बापानेच मुलाची लोखंडी गजाने केली हत्या, माढ्यात खळबळ

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. याच कारणातून रागाच्या भरात बापानेच आपल्या तरुण मुलाची हत्या केली.ही घटना माढा तालुक्यातील रुईमध्ये घडली.

शेतीला पाणी देण्यावरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाले होते. या वादात बापाला मुलाने शिव्या दिल्याचा राग आला होता हाच राग मनात धरून वडिलाने घरात झोपलेल्या अवस्थेतील मुलाला लोखंडी गजाने मारहाण करून त्याची हत्या केली.

याप्रकरणी मृत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून हत्या केलेल्या राजेंद्र पतंगे या बापावर टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केली आहे. किरकोळ कारणावरुन मुलाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.करमाळ्यात १० दिवसांत ५ महिला बेपत्ता; गुढ वाढल्याने पोलिस अलर्टवरसोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून गेल्या दहा दिवसांत पाच महिला आणि तरुण मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

एकामागोमाग एक घडणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, यामागे काही संघटित टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तातडीने तपासासाठी कामाला लागली असून विविध मार्गांनी शोध सुरू आहे. एकाच भागातून इतक्या मोठ्या संख्येने महिला बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातून फक्त १० दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणांहून ५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. महिला बेपत्ता होऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने करमाळा पोलिसही अलर्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व घटनांची गंभीर दखल घेत महिलांना शोधण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

करमाळा पोलिसांनी एक सुचना जारी केली आहे. ” बेपत्ता झालेल्या महिलां महिला किंवा तरुणींबाबत काहीही माहिती मिळाल्यास, त्यांनी त्वरित करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें