घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

इराणच्या सर्वात मोठ्या हल्ल्याने खळबळ, धमकीनंतर थेट ॲक्शन

अशातच आता इराणने बहरीनमधील ॲमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात ॲमेझॉन अंतर्गत येणाऱ्या बटेल्को कंपनीच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही इमारत बहरीनमधील हमाला या भागात आहे. बटेल्को ही बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून ती ॲमेझॉन वेब सर्विससाठी काम करते. बहरीन सरकारनेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

इराणने काल दिली होती धमकीसमोर आलेल्या माहितीनुसार कार इराणच्या सैन्याने गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल यांसारख्या अमेरिकेतील 18 प्रमुख कंपन्यांवर 1 एप्रिलपासून हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता इराणने हा हल्ला केला आहे.

ॲमेझॉनच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला असे दर्शवतो की हे युद्ध आता पारंपरिक आणि लष्करी ठिकाणांपुरते मर्यादित न राहता आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आगामी काळात हे युद्ध आणखी भीषण रूप धारण करण्याची शक्यता आहे.

अमेरिकेला मदत करत असल्याचा कंपन्यांवर आरोपइराणच्या लष्कराने काल अमेरिकन कंपन्यांबाबत एक निवेदन जारी केले होते. यात त्यांनी म्हटले होते की, ‘या मोठ्या आयटी आणि एआय कंपन्या इराणविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये अमेरिकेला मदत करत आहेत.

या कंपन्या केवळ सॉफ्टवेअर तयार करत नाहीत, तर हल्ल्यांची योजना आखण्यात आणि ते अंमलात आणण्यातही सहभागी आहेत. इराणच्या या निवेदनात गूगल आणि मायक्रोसॉफ्टसोबतच एंथ्रोपिक आणि ओपनएआयसारख्या प्रसिद्ध एआय कंपन्यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

इराणी लष्कराने पुढे म्हटले होते की, ‘इराणमध्ये होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही काही निवडक कंपन्या आणि त्यांच्या युनिट्सना पूर्णपणे नष्ट करू. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले प्राण वाचवण्यासाठी तात्काळ कार्यालय किंवा कार्यस्थळ सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता.त्यानंतर आता इराणने हा हल्ला केला आहे.

या 18 कंपन्यांना धमकी

डेल

मायक्रोसॉफ्ट

गूगल

अ‍ॅपल

इंटेल

IBM

टेस्ला

बोइंग

ह्यूलेट

पॅकार्ड

HP

सिस्को

ओरेकल

मेटा

जेपी मॉर्गन

जनरल इलेक्ट्रिक

G42

एनव्हिडियाप्लॅन्टर

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें