घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

पुण्यातील भोसरी परिसरात वैवाहिक वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला सापळ्यात ओढत त्याच्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी 28 वर्षीय पतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिलेने पतीला भोसरी येथे बोलावले. त्यानंतर तिच्या प्रियकराने पतीला आपल्या घरी नेले. येथे दोघांनी मिळून त्याला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले. पती नशेत गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रियकराने लाकडी दांडक्याने त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. यावेळी महिलेने घराचा दरवाजा आतून बंद ठेवत हल्ल्याला मदत केली. एवढेच नव्हे, तर प्रियकर रबरी पाईपने मारहाण करत असताना पत्नीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर पैलू उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे भोसरी परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें