घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

एकीकडे ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’चा गजर अन् डोंगरावर दक्षिण दरवाजाजवळ कोसळली वीज

कोल्हापुरातील दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत.भक्तांनी जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली. मानाच्या सासन काट्या घेऊन भाविक हलगीच्या तालावर थिरकत होते.

पण, अशातच जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत ५ जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरूआहे.जोतिबाच्या नावाने चांगभलं म्हणत आज लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते.

एकीकडे भाविक जोतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत होते. त्याचवेळी दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाशेजारी उभे असणाऱ्या एका गाडी जवळील ५ जण किरकोळ जखमी झाले. पाचही जणांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं.

पाचही जण ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणाहून सात ते आठ फूट अंतरावर ही वीज कोसळली होती. इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्डच्या संपर्कात आल्याने पाच जणांना किरकोळ दुखापत झाली,

जखमी झालेल्यांची नावं

भिमराव पांडुरंग देसाई (वय 52 वर्ष )

राजाराम गुंडू पेडणेकर (वय 62)

पांडुरंग शंकर पेडणेकर (वय 43)

जयसिंग बाबुराव देसाई (वय 72)

प्रथमेश विनायक देसाई (वय 20)

शिवाजी धोंडीराम निकम (वय 47)

वरील सर्व जखमी झाले असून हे सर्वजण कागल तालुक्यातील अर्जुनी गावातले राहणारे होते. तर विठ्ठल लक्ष्मण केंगा हे चिमगावात राहणार आहे. जखमींना तातडीने छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अर्थातच सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली किमान 12 तास त्यांना ठेवण्यात आलं आहे. या घटनेमुळे मात्र, भाविकांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें