घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला ‘बूस्टर डोस’

शहरातील गुन्‍हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने आणखी पाच नवीन पोलीस ठाणी आणि स्वतंत्र ‘परिमंडळ ४’ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.यामुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि प्रतिसाद वेळ मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील वाढती लोकसंख्या, आयटी पार्क्स, औद्योगिक वसाहती आणि विस्तारणारे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन हा प्रस्ताव सादर केला आहे.सध्या आयुक्तालयाच्या हद्दीत १८ पोलीस ठाणी आणि २ परिमंडळे कार्यरत आहेत.

मात्र, हिंजवडी, चिखली, भोसरी आणि तळेगाव दाभाडे यांसारख्या भागांत नागरिकांना पोलीस मदतीसाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत होता.ही समस्या दूर करण्यासाठी विद्यमान पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नवीन ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रस्तावानुसार पिरंगुट, जांभे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूरोड (विभाजित) येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नव्या परिमंडळासाठी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी आणि आवश्यक मनुष्यबळासह एकूण ९१३ नवीन पदांची निर्मिती होणार आहे.

या निर्णयामुळे गुन्ह्यांवर जलद कारवाई, घटनास्थळी पोलिसांचा तातडीने प्रतिसाद आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे. सध्या हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, मंजुरी मिळताच शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रस्तावित नवीन पोलीस ठाणी– पिरंगुट पोलीस ठाणे– जांभे पोलीस ठाणे– पिंपळे सौदागर पोलीस ठाणे– मोशी पोलीस ठाणे– देहूगाव पोलीस ठाणेअसे वाढणार मनुष्‍यबळया नवीन विस्तारामुळे केवळ इमारतीच वाढणार नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आणि पदनिर्मिती देखील होणार आहे.

प्रस्तावानुसार: परिमंडळ ४ साठी स्वतंत्र पोलीस उप आयुक्त (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर कर्मचारी अशा एकूण ३३ पदांची मागणी करण्यात आली आहे.पाच नवीन पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी १०० ते १६० याप्रमाणे एकूण ९१३ नवीन पदे (पोलीस अधिकारी व अंमलदार) निर्माण केली जाणार आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें