घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देतानाच, पालकमंत्र्यांनी मूलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष वेधले आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आता थेट विकासनिधीचीच अट घातली आहे.

१२० गावांचा प्रश्न सुटणारजिल्ह्यातील १२० गावांमध्ये जागा उपलब्ध असूनही सुविधांचा अभाव होता. यावर भाष्य करताना पालकमंत्री म्हणाले की, “आम्ही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र धोरण राबवत आहोत. ज्या गावांत ही सुविधा नसेल, तिथे प्राधान्याने कामे पूर्ण केली जातील.”

मोठा ‘बूस्टर’ मिळणारविकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच पालकमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत “मैं जो बोलता हूँ, वो मैं करता हूँ” म्हणत सोलापूरच्या विकासाला मोठा बूस्टर देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सीईओ कुलदीप जंगम, आ. देवेंद्र कोठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जमीन आहे पण सेवासुविधा नाहीत….जिल्ह्यातील १२० गावात स्मशानभूमीसाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र त्या स्मशानभूमीतील सेवासुविधा निर्माण करण्यासाठी निधीची गरज आहे.याबाबत पालकमंत्री म्हणाले की, त्या स्मशानभूमीसाठी निधी दिला जाईल, कोणतेही अडचण नसल्याचे ते म्हणाले.

मैं जो बोलता हूँ… वो मैं करता हूँ…विकासकामांसाठी निधी कमी पडणार नसल्याचे बोलत असतानाच मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ… असे म्हणत पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या विकासाला मोठे बुस्टर देण्यात येणार असल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील प्रत्येक गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें