घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

50 लाखांची खंडणी, शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं

हनुमान जयंती शोभायात्रेतून अपहरण करून अवघ्या १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. सोमवारी गुन्हे शाखेने या घटनेचा उलगडा केला. जयराम गोपाल यादव (१९, रा.आयबीएमरोड), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन साहू (१९, रा. शिवशंकर मंदिरासमोर, मानकापूर) अशी मारेकऱ्यांची नावे आहे.

अश्विन (नाव बदलले आहे) याचा शेजारी जय हाच या हत्येचा सूत्रधार आहे. अश्विन जयला दादा म्हणायचा, त्याच्यावर विश्वास असल्यानेच तो जयसोबत गेला. त्यामुळे पेशवाईच्या इतिहासातील ‘काका मला वाचवा’ची पुनरावृत्ती येथे झाल्याचे दिसून येते.

अश्विनचे वडील दिलीप हे भाजीपाल्याचे थोक विक्रेते आहेत. तिन्ही आरोपीसुद्धा भाजी पाल्याचा व्यवसाय करतात. अश्विनच्या वडिलांकडून हे तिघेही अनेकदा भाजीपाला खरेदी करत. यातील आयुष हा पार्सल पोहोचविणाऱ्या कंपनीतही काम करतो. त्यासाठी त्याने महिंद्राची एक चार चाकी गाडीही घेतली होती. हीच गाडी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे.

अश्विनचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते दिलीप यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता.२ एप्रिल रोजी अश्विनच्या राहत्या घरासमोरून हनुमान जयंतीची शोभायात्रा जात होती. अश्विन या शोभायात्रेत होता. तेव्हा या परिसरात आईस्क्रिमचे वाटप सुरू होते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ‘चल आपण एक फेरफटका मारून येऊ व बाथरूमला जाऊ’ असे सांगून जय अश्विनला घेऊन गेला.

आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. त्या तिघांनी अश्विनला आयुषच्या गाडीत बसविले व तेथून निघाले.उंदीर मारण्याच्या औषधाचा वापरजय हा अश्विनचा शेजारी होता, अश्विन त्याला दादा म्हणत असे. त्यांची चांगली ओळख होती म्हणूनच तो जयसोबत गेला. काही अंतर दूर गेल्यानंतर अश्विनने दादा आपण इतक्या दूर कसे काय आलो? असा प्रश्न केला. यावर जयने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. या बोळ्याला उंदीर मारण्याचे औषध लावले होते.

यामुळे अश्विन बेशुद्ध होईल असा आरोपींचा अंदाज चुकीचा ठरला. अश्विन आरडाओरडा करू लागला. अखेर या गोंधळात आरोपींनी कापडाच्या साहाय्याने अश्विनचा गळा आवळून खून केला. पुढे आरोपींनी अश्विनची बॉडी एका पोत्यात टाकली व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरातील रिंगरोडलगत फेकून दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासादरम्यान अश्विन अखेरचा जयसोबतच आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. गिट्टीखदान पोलिस व गुन्हे शाखेने जयची चौकशी केली. येथे जयच्या जबाबात तफावत आढळून आली. अखेर कसून चौकशी केल्यावर जयने गुन्ह्याची कबुली दिली.

या चौकशी दरम्यान पोलिसांनी जयला चांगलाच पोलिसी हिसका दाखविल्याचे कळते. मात्र, त्याच्या डोळ्यात आसवाचे टिपूसही नव्हते. यावर ‘मुझे रोनाही नही आता,’ असे जयने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला सांगितल्याचे कळते.जय आला तक्रार द्यायलाअश्विनच्या हत्येनंतर त्याचं शव आरोपींनी भरतवाडा परिसरात फेकून दिला.

यानंतर तिघेही आपआपल्या घरी परतले. त्यानंतर अश्विनच्या पालकांसोबत जय स्वत: गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आला. त्यामुळे स्वत: हत्या केल्यानंतर साळसुदपणाचा आव आणून जय अश्विनच्या कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात तक्रार द्यायलाही आला होता, हे विशेष.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें