घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बारामतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम आरोपीला शहर पोलिसांकडून अटक

अवघ्या १० वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी हसन शमशुध्दीन झारे उर्फ राजू (वय ५२, रा. खोली क्र. ८, अनंतआशा नगर, बारामती) या नराधमाला अटक केली.

विशेष म्हणजे त्याला यापूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात १० वर्षाची सक्तमजूरी झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याने हे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

त्याच्या विरोधात शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ७४, ७५ तसेच ३५२ व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत पिडीतेच्या कुटुंबाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

तो शेजारीच राहणारा आहे. त्याने परिचयाचा गैरफायदा घेत या पिडितेला चाॅकलेटचे अमिष दाखवत घरात नेत तिच्याशी अश्लिल कृत्य केले, तसेच संबंधित घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत देखील त्याने यापूर्वी अश्लील वर्तन केल्याचे तपासात समोर आले आहे.पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल, अप्पर अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख अधिक तपास करत आहेत.

विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वी २००९ मध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याने १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यात त्याला १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. आता त्याने १० वर्षीय बालिकेला आपली शिकार बनवल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें