घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सोळा टोळ्यांतील ७९ गुंडांवर ‘मकोका’

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील १६ गुन्हेगारी टोळ्यांतील ७९ गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत पोलिसांनी ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली. या गुंडांवर पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळीप्रमुखांची नावे : विशाल उर्फ मन्या कांबळे (रा. काळेवाडी) व तीन साथीदार, शुभम गोळे (रा. पिरंगुट) व चार साथीदार, दयामन्ना उर्फ सुनील शिवपुरे (रा. देहूरोड) व साथीदार, रोहन गुंडिले (रा. रहाटणी) व चार साथीदार, हुसेन डांगे (रा. गहुंजे) व साथीदार, बसुराज उर्फ बश्या हेळवे (रा. चिंचवडेनगर) व तीन साथीदार, वैभव नागझरकर (रा. काळेवाडी) व साथीदार, जलालुद्दीन उर्फ सोनू शेख (रा. वाकड) व आठ साथीदार, विराज कड (रा. कडाचीवाडी, चाकण) व सहा साथीदार, दिवाकर सिंग (रा. दिघी) व पाच साथीदार, विराज काटे (रा. औंध) व अकरा साथीदार, विक्रांत उर्फ सरडा देवकुळे (रा. औंध) व चार साथीदार, विनोद गायकवाड (रा. रावेत) व तीन साथीदार, किशोर ढवळे (रा. अपर डेपो) व साथीदार, आदर्श कामटीकर (रा. आंबेगाव) व तीन साथीदार, विकी घोलप (रा. चिंचवडगाव) व सहा साथीदार.

दरम्यान, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चौघांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले आहे. यामध्ये रामदास साळुंके (रा. आंबेठाण) यास नागपूर कारागृह, नागपूर, अर्जुन राठोड (रा. रासे, ता. खेड) यास हर्सुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर, शरद मोरे (रा. रिहे, मोरेवाडी, मुळशी) यास कळंबा कारागृह, कोल्हापूर, रणजीत येरकर (रा. नाणेकरवाडी) यास येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें