घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भाईला ‘बाई’ करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

पुण्यात एका सामाजिक कार्यक्रमात पुणे पोलीस उपायुक्तांनी केलेल्या विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचं आश्वासन देताना पुणे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी भाईला बाई करू असं विधान केलं.

आपण केलेल्या विधानाची जाणीव होताच त्यांनी सावरून घेतलं. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्यांची सुटका करून त्यांचे समुपदेशन करण्यासही कृषिकेश रावले यांनी सांगितलं.अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात आणि गुंडागर्दी करणाऱ्या भाईंबाबत बोलताना पुणे पोलीस उपायुक्त रावले म्हणाले की, ते कुठून आणातात काय आणतात, कुणी लपवून बसले आहेत.

हा भाई, तो भाई… सगळ्या भाईला आपण बाई करू… रावले यांनी हे विधान करताच सावरत त्यांनी मी महिलांबद्दल बोलत नाहीय असंही स्पष्ट केलं. पण त्यांना भाई म्हणायचंय म्हणून बोलतोय असंही म्हणाले.पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी कार्यक्रमात बोलताना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची सुटका करण्याबाबत मार्गदर्शन केलं.

व्यसनाधीन झालेल्यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्यांचं समुपदेशन केलं जाईल असं ते म्हणाले.कृषिकेश रावले यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रियाही समोर येत आहेत .काहींनी यावर टीका केली असून काहींनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका बड्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचं विधान योग्य नसल्याचंही म्हटलं जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें