घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भारतीय संविधान लोकशाहीचा प्राण आणि आजचे समाजवास्तव

लेखक-जगदीश आत्माराम कांबळे(सर )

भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे प्राण आहे. लोकशाहीला दिशा देणारे, नियमबद्ध करणारे आणि देशाला एकत्र बांधून ठेवणारे हे सर्वोच्च कायदेपुस्तक आहे. आपल्या देशातील विविध धर्म, संस्कृती, परंपरा आणि चालीरीती यांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधानाने केले आहे.
भारतीय संविधानाचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, त्यावर अनेक देशांच्या राज्यघटनांचा प्रभाव आहे. इंग्लंड, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. या महान कार्याचे श्रेय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना जाते.

संविधानामध्ये न्यायव्यवस्था, मंत्रिमंडळ, संसद पद्धती, शिक्षण व्यवस्था, निवडणूक आयोग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. लोकशाहीची व्याख्या करताना अब्राहम लिंकन यांनी “लोकांचे, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही” असे म्हटले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, “आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही होय.”

संविधान जितके सक्षम, तितकी लोकशाही अधिक बळकट होत जाते. मात्र, डॉ. आंबेडकरांनी यावर स्पष्ट भाष्य केले होते की, संविधानात समता, बंधुता, न्याय यांसारख्या मूल्यांचा समावेश असला तरी ते प्रत्यक्षात राबवणारे राज्यकर्ते कसे आहेत, यावरच त्याचे यश अवलंबून असते.

आपण लोकशाही पद्धती स्वीकारली असून, आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासन चालवतो. प्रत्येक नागरिकाला थेट सत्तेत सहभागी होता येत नाही, म्हणून आपण निवडणुकीद्वारे आमदार, खासदार यांची निवड करतो. हे प्रतिनिधी आपल्या समस्या आणि प्रश्न संसदेत व मंत्रिमंडळात मांडतात. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना अनेक महत्त्वाचे अधिकार दिले. महिलांसाठी प्रसूतीनंतर पगारी रजा, कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी, आठ तास कामाची मर्यादा, रविवारची सुट्टी, बोनस, तसेच देशात कुठेही फिरण्याचे, बोलण्याचे आणि अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य यांसारखे अधिकार त्यांनी सुनिश्चित केले.
आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. त्यामुळे समाजात सलोखा, एकता आणि बंधुता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. धर्माच्या नावावर होणारे वाद, दंगली आणि हिंसाचार थांबवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने समानता, सहकार्य आणि देशभक्तीची भावना जोपासली पाहिजे.
आजच्या युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. समाजहित जपणे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें