घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

प्रशांत वाघमारेंच्या ‘मर्जीतील’चौकडीचे बांधकाम विभागात साम्राज्य.

पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे निवृत्त होऊनही बांधकाम विकास विभागावर त्यांचेच वर्चस्व असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.वाघमारे यांच्या अत्यंत मर्जीतील काही ठराविक अधिकारी तांत्रिक गुणवत्ता नसतानाही वर्षानुवर्षे याच विभागात ठाण मांडून बसले असून, महापालिका प्रशासनापेक्षा ‘खाजगी’ हितालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

या ‘संघटित टोळी’ने हजारो कोटींच्या टीडीआर आणि चुकीच्या बांधकाम परवान्यांच्या माध्यमातून पुण्याचा चेहरा विद्रुप केल्याचा आरोप करत, या सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.

सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच विभागात ठराविक वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. मात्र, वाघमारे यांच्या कार्यकाळापासून कार्यकारी अभियंता जयवंत पवार, कार्यकारी अभियंता सुरेश साखळे, कनिष्ठ अभियंता तथा तांत्रिक पीए संजय शिंदे, अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि संदीप चाबुकस्वार यांसारख्या अधिकाऱ्यांनी या नियमाला हरताळ फासला आहे.

विशेष म्हणजे, यातील अनेक अधिकारी केवळ ‘डिप्लोमा’ धारक असूनही, जेष्ठता डावलून आणि मुख्य सभेची मान्यता न घेता त्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.अधिकारी की खासगी एजंट?तक्रारीनुसार, या अधिकाऱ्यांचे कारनामे थक्क करणारे आहेत. जयवंत पवार: कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता असा संपूर्ण प्रवास केवळ बांधकाम विभागातच.

पदवी नसतानाही विशेष अधिकारात पदोन्नती.साखळे दांपत्य: सुरेश साखळे आणि त्यांच्या पत्नी गेली १०-१२ वर्षे नियमबाह्यरीत्या याच विभागात कार्यरत आहेत. मूळ नियुक्ती इतर विभागात असूनही केवळ आर्थिक बळावर बांधकाम विभागात ‘सेट’ असल्याचा आरोप.

संजय शिंदे: २०१७ मध्ये नियुक्त झालेले शिंदे हे अवघ्या काही काळातच वाघमारेंचे तांत्रिक सहाय्यक झाले. बदली होऊनही तीन वर्षांपासून पद सोडण्यास तयार नाहीत.संदीप चाबुकस्वार:वाघमारे यांच्या मुलाच्या लग्नासारख्या खाजगी कामांसाठी एक-एक महिना सरकारी कर्तव्याऐवजी खाजगी जबाबदाऱ्या सांभाळल्याचा खळबळजनक आरोप.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें