घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कात्रज ची मुलगी कुमारी वैष्णवी मछिंद्र देशमुख हिची पुणे शहर पोलीस पदी निवड!

वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला वैष्णवी हिने अतिशय मेहनत करून पूर्ण केले. आपली मुलगी पोलीस व्हावी हे स्वप्न पाहणारे वैष्णवी चे वडील रोजच्या देवपूजेचे हार कात्रज परिसर व मार्केट यार्ड येथे घरोघरी पोहोचवण्याचे काम करतात, अतिशय मेहनत आणि कष्ट करून त्यांनी वैष्णवी ला वाढवले आणि शिकवले.

वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी वैष्णवी हिने देखील सलग तीन वर्ष अतिशय मेहनत करून आज ते सत्यात उतरवले. दोन वेळा थोड्या फरकाने अपयश आले परंतु ती कुठेही थांबली नाही! पहिल्या वेळी मुंबई पोलीस भरती साठी प्रयन्त केलेल्या वैष्णवी ला सहा मार्कांनी आणि दुसऱ्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस भरती साठी तीन मार्कांनी तिला अपयश आले.

परंतु तिसऱ्या वेळी पुणे शहर पोलीस भरती मधे मात्र तिला संपूर्ण यश मिळाले. कोणत्याही क्षेत्रात मेहनत आणि सातत्य कायम ठेऊन त्यात आपण यश मिळवू शकतो हे वैष्णवी आज अभिमानाने सांगत आहे.

दुसऱ्या वेळी पुणे ग्रामीण पोलीस भरती मधे अपयश आल्यानंतर वडिलांच्या आशा मावळल्या होत्या! परंतु मागे न हटता, आपल्या जिद्दीच्या जोरावर तसेच जय जवान करियर अकॅडमी चे संस्थापक श्री. समाधान देशमुख सर यांच्या सातत्य पूर्ण सराव, तसेच मार्गदर्शनाने वैष्णवी ची आज पुणे शहर पोलीस पदी निवड झाली आहे.

स्वभावाने अतिशय नम्र आणि शिस्तप्रिय असणाऱ्या वैष्णवी हिचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे! नुकताच तिच्या समाजाच्या श्री गुरव प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेकडून सत्कार व सन्मान करण्यात आला.

पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य तसेच जिवलगांकडून वैष्णवी हिच्या यशासाठी डीजे लावून मिरवणूक काढावी असे नियोजन सुरू असतानाच वैष्णवी ने मात्र या गोष्टीसाठी पूर्णपणे विरोध दर्शवून तो सर्व खर्च टाळून गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले आहे! तसेच तिच्या आयुष्याची पहिली कमाई म्हणजेच तिचे पहिले मानधन ती अनाथ आश्रमासाठी देणार असल्याचेही तिने सांगितले आहे!

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें