घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

श्री गुरुजी बुवा भंडारा महोत्सव उत्साहात साजरा

शिवगंगा खोरे परिसरातील कल्याण, घेरा सिंहगड भिलारवाडी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुजी बुवा भंडारा महोत्सव अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय भंडारा महोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी श्री गुरुजी बुवा यांच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विधिवत सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या महोत्सवाची एक खास परंपरा म्हणजे गावातील तरुण मंडळींकडून भिक्षा मागून आणण्याची रुढी. यंदाही सर्व तरुण मंडळींनी गावातील प्रत्येक घरात जाऊन भिक्षा मागून ही परंपरा जपली.

यावेळी कल्याण गाव भजनी मंडळाच्या लहान मुलांनी भिक्षा दिंडीचे आयोजन केले होते. लहान वयातच धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख करून देणारी ही दिंडी उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली व सर्वत्र कौतुकाचा विषय बनली.संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता किर्तन सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कीर्तन सेवेसाठी ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांची कीर्तन सेवा लाभली. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.महोत्सवानिमित्त भव्य विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.

ही सजावट ग्रामपंचायत सदस्य संदीप रेणुसे तसेच नरवीर तानाजी मालुसरे मित्र मंडळ, भिलारवाडी यांच्या सहकार्याने करण्यात आली. तसेच कल्याण, माळवाडी, राहटावडे, मोरदरीवाडी व कोंढणपूर येथील भजनी मंडळांची विशेष उपस्थिती लाभली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भिलारवाडी तरुण मंडळ, घेरा सिंहगड यांच्या वतीने करण्यात आले होते. या महोत्सवाबाबतची माहिती ह.भ.प. आमोल मोरे यांनी दिली. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचे सुंदर दर्शन घडवणारा श्री गुरुजी बुवा भंडारा महोत्सव यंदाही यशस्वीपणे पार पडला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें