घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या गुन्ह्यात पोलीस गाडी जप्त करू शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा निर्णय

चालक केवळ मद्यधुंद अवस्थेत आहे या कारणावरून पोलीस गाडी ताब्यात घेऊ शकत किंवा जप्त करू शकत नाहीत, असा महत्वपूर्ण निर्वाळा तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती ई.व्ही वेणुगोपाल यांनी एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला.

या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तर त्याला गाडी चालवण्यापासून रोखू शकता, पण वाहन जप्त करू शकत नाही. अशा स्थितीत चालकाच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्राला गाडी ताब्यात घेण्यास बोलवावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जर कोणताही पर्याय नसेल तर वाहन सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालकाच्या स्वाधीन करावे असे न्यायालयाने पुढे नमूद केले.ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये पोलीस सरसकट गाड्या जप्त करतात.

यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्ते सुरक्षा महत्त्वाची असली तरी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें