घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये रेडिमिक्स प्रकल्पामधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

पुणे, दि. 10 — उंड्री (ता. हवेली) परिसरातील रेडिमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग, झोन-१च्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून, सुमारे २७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडण्यात आली.

या कारवाईत अनधिकृत शेड, स्ट्रक्चर्स, यंत्रसामग्रीसाठी उभारलेली बांधकामे तसेच परवानगीशिवाय उभारण्यात आलेले विविध घटक हटविण्यात आले. संबंधित प्रकल्पांनी आवश्यक परवानग्या न घेता काम सुरू ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि कार्यकारी अभियंता सुरेश साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे व राहुल सोरटे, तसेच कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवार, राजेंद्र फुंडे, सागर शिंदे व किरण आहिरराव यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ (बिगारी) तसेच दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.यावेळी एकूण ७ RMC प्लांट्सवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकल्पांविरुद्ध पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच महावितरण (MSEB) यांना कळविण्यात आले आहे.

कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई सुरळीत पार पडली.

*नियमबाह्य RMC (रेडिमिक्स काँक्रीट) प्लांट व बांधकामांवर तात्काळ कारवाई करून ते पाडण्यात येतील. परवानगीशिवाय प्रकल्प चालविणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. RMC प्लांट सुरू करण्यापूर्वी पुणे मनपा, MPCB व MSEB यांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे.*संदीप शिंदे उपअभियंता बांधकाम विभाग पुणे मनपा

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें