घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

द्रविड हायस्कूलच्या कु. जिनल चौगुले हिचे ‘सानंद गंगा लहरी’ कार्यक्रमात उल्लेखनीय यश. ( वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे )

पुणे, दि. ११ एप्रिल २०२६ – पुण्यातील पी. वाय. सी. जिमखाना येथे आयोजित ‘सानंद गंगा लहरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूल, वाई येथील विद्यार्थिनी कु. जिनल चौगुले (इयत्ता ५ वी) हिने आपल्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकत उल्लेखनीय यश संपादन केले.
या कार्यक्रमात विविध वयोगटातील स्पर्धकांनी श्लोक व स्तोत्र पठण सादर केले. त्यामध्ये सर्वांत लहान सहभागी म्हणून जिनल चौगुले हिने ‘गंगा लहरी’ स्तोत्रातील एक ते वीस श्लोकांचे लयबद्ध, स्पष्ट आणि शुद्ध उच्चारणासह केलेले सादरीकरण विशेष ठरले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळी छाप पाडली.
कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर श्री. अनिल भोसले, प्रसिद्ध सर्जन डॉ. पांडुरंग बोकील तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका अॅड. नीलिमा म्हैसूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जिनलच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले.
दरम्यान, या यशामुळे द्रविड हायस्कूल, वाई येथे आनंदाचे वातावरण पसरले आहे. शाळा समितीचे अध्यक्ष मा. नितीन पोरे, शालाप्रमुख श्री. दत्तात्रय भोसले, उपशालाप्रमुख श्रीमती मुळे, पर्यवेक्षक श्री. नवले, संस्कृत विभाग प्रमुख श्रीमती हिरवे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी जिनल चौगुले हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय यशामुळे द्रविड हायस्कूल, वाई या संस्थेचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें