पुणे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणारे पुण्यातील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत काकासाहेब मोरे यांना “भारत की शान” या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथे अँटी करप्शन बोर्ड ट्रस्टच्या वतीने आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. समाजासाठी सातत्याने आणि निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.या गौरव सोहळ्यास आर. के. जैन साहेब, ज्योती जैन, अण्णाजी खैरनार, बाविस्कर साहेब, निकम साहेब, आनंदीजी यादव साहेब तसेच सुरेंद्र मुनोथ यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री. मोरे हे वैद्यकीय मदत, अपघातग्रस्तांना सहाय्य, सामाजिक न्याय आणि गरजू नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील अनेकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना “भारत की शान” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.











