घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लैंगिक छळ प्रकरणी ‘टीसीएस’ची मोठी कारवाई

भारताची सर्वात मोठी आयटी सेवा निर्यात करणारी कंपनी Tata Consultancy Services (TCS) नाशिक येथील युनिटमध्ये लैंगिक छळ आणि कथित धर्मांतरच्या घटनांबाबत दाखल झालेल्या नऊ एफआयआरमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कंपनीने कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा जबरदस्तीबाबत zero tolerance धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात तपास सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

12 एप्रिल रोजी टीसीएसच्या प्रवक्त्याने सांगितले की, नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली. तपास सुरू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आम्ही स्थानिक पोलिस प्रशासनासोबत पूर्ण सहकार्य करत आहोत आणि पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल.

कंपनीने पुढे म्हटले की, टीसीएसमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा दबावाला शून्य सहनशीलता आहे. आम्ही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.एफआयआर आणि अटक केलेले आरोपीनाशिक पोलिस सध्या कंपनीतील एका एचआर अधिकाऱ्याची चौकशी करत आहेत. ही अधिकारी पुण्यात कार्यरत असून तक्रारदार महिलांनी पूर्वी तक्रार करूनही तिने योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार काही पीडित महिलांनी यापूर्वी एचआर व्यवस्थापकाकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला पुढील तपासासाठी नोटीस बजावली आहे.हे प्रकरण मार्च महिन्यात समोर आले, जेव्हा एका महिलेने सहकाऱ्याने लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतरच्या तपासात आणखी आठ एफआयआर नोंदवण्यात आले.

ज्यात लैंगिक छळ आणि धार्मिक रूपांतरणासंबंधी आरोपांचा समावेश आहे. आतापर्यंत कंपनीत कार्यरत असलेल्या किमान सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत:

आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसीफ अत्तर आणि दानिश शेख. याशिवाय एका महिलेचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे, मात्र तिची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

तक्रारींचा स्वरूपया प्रकरणात आतापर्यंत किमान आठ महिला आणि एका पुरुषाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार संबंधित गटाकडून काहींवर गोमांस खाण्यासाठी दबाव टाकणे, हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवणे, तसेच काही प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें