घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

रिक्षाचालक युनूसनं संधी साधली अन् केलं भयंकर कृत्य

हडपसर परिसरात 11 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग करून पसार झालेल्या 55 वर्षीय रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक करून अवघ्या 24 तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना, युनूस गफार खान (वय ५५, रा.कोंढवा) या रिक्षाचालकाने संधी साधून तिच्याशी अश्लील कृत्य केले होते.युनूस गफार खान या रिक्षाचालकाने पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना संधी साधून तिच्याशी अश्लील कृत्य केले.

या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती, मात्र तिने धिर न सोडता घरी जाऊन पालकांना सर्व हकीगत सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी खान फरार झाला होता.

मात्र, परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक दत्तात्रय खेडेकर, विनोद साने व कानेकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे इतकी वेगाने फिरवली की, आरोपीला अटक केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून 24 तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें