घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

चाकणकर भगिनींनतर कुटुंबातील तिसरी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. आज तिसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

न्यायालयाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. आता पुन्हा एसआयटीकडून चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मागितला आहे. त्यामुळे अशोक खरातसमोरील अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.दरम्यान, अशोक खरातशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. यात चाकणकर भगिनींचा देखील समावेश आहे.

या प्रकरणी आधीच रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं आहे.

मागील वर्षभरात प्रतिभा चाकणकर यांनी खरातला तब्बल २३६ कॉल केल्याचं समोर आलं होतं.मागील चार तासांपासून शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची चौकशी सुरू आहे. अशोक खरात बनावट बँक खात्यांच्या प्रकरणात त्यांची चौकशी आहे.

अशोक खरातशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण चार खाती आहेत. यात प्रतिभा चाकणकर यांचे दोन तर त्यांच्या दोन मुलांच्या नावाने दोन खाती या बँकेत आहेत. या चारही खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याची माहिती आहेत.

चाकणकर भगिनींनतर आता चाकणकर कुटुंबातील तिसरी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आली आहे. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. मागील चार तासांपासून दोघंही शिर्डी पोलीस ठाण्यात आहेत. चाकणकर कुटुंबाच्या चार खात्यांवरून 2 कोटी 40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. याच व्यवहाराबाबत दोघांची चौकशी सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें