घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

दोन तरूण, १८० मुलींना जाळ्यात ओढलं, ३५० व्हिडिओ व्हायरल, अमरावतीत खळबळ

भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लिल व्हिडिओ बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याचं प्रकरणही ताजेच आहे.यातच आता अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील परतवाडा येथे सोमवारी ( १३ एप्रिल ) उघडकीस आलेल्या व्हिडिओ कांडामुळे धक्काच बसला आहे.

सोशल मीडियावर सुमारे ३५० अश्लिल व्हिडिओ आणि अनेक आपत्तीजनक फोटो व्हायरल झाले आहेत. यात तब्बल १८० मुलींवर अत्याचार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण परसले आहे. संबंधित मुलींना फसवून, त्यांचे गुप्तपणे चित्रीकरण करून हे व्हिडिओ तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

यासंदर्भात बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, “मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन मुलांनी साधारपणे ३५० अश्लिल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले जाते. यात हिंदू आणि अल्पवयीन मुलींचा समावेश. यामाध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, पैसे उकळणे आणि वेश्यावृत्तीकडे ढकलणे, असे प्रकार केले जात असे.”

“अतिशय गंभीर प्रकरण परतवाड्यात सुरू आहे. लव्ह जिहाद हे होतेच, पण पोरांची टोळी अशी कृत्ये करत आहे. यात मुस्लीम आणि हिंदूही मुली पीडित आहेत. यात १८० मुलींवर अत्याचार झाल्याचा अंदाज आहे. ३५० व्हिडिओ स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले आहेत,” असा दावाही खासदार बोंडेंनी केला आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “हे प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने पोलीस विभागाचे महासंचालक, आयजी आणि एसपी यांच्याशी माझी चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली आहे. खासदार अनिल बोंडेंनी पुरावे पोलिसांना दिले आहेत. हा लहान विषय नाही. मोठा विषय आहे. याप्रकरणी कारवाई करू. संवेदनशील विषय आहे. अमरावतीत हा विषय होणे अजून संवेदशील आहे. आम्ही मोठी यंत्रणा लावून चौकशी करू.”

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें