गेल्या काही दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात अंमली पदार्थांचा वापर मोठछ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचा पडत जाणारा विळखा नष्ट करणे, याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
अशातच आाता लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने दोन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. उपनगरातील गोरेगाव पूर्वेला असलेल्या नेस्को सेंटरमध्ये सुरू असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ही घटना घडली. 11 एप्रिल रोजी ही घटना घडली असून या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
ज्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, ते एमबीएचे विद्यार्थी होते, असे सांगण्यात आले असून या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी 11 एप्रिलला गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी दोन ते तीन हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान जास्त प्रमाणात मद्यपान आणि अंमली पदार्थ घेतल्यामुळे काहींना त्रास झाला. यातील दोन तरुणींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये, तर एका तरुणाला गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, तर सोमवारी (ता. 13 एप्रिल) दुपारी एका तरुणीचाही मृत्यू झाला.
जोगेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.धक्कादायक बाब म्हणजे. मृत तरुण आणि तरुणी हे दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. ते 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपसह या लाईव्ह कॉन्सर्टला उपस्थित होते. पोलिसांनी मयत विद्यार्थ्यांची ओळख सांगण्यास नकार दिला आहे.
तसेच, ज्या दोघांचा मृत्यू झाला आहे, त्यांनी कॉन्सर्टच्या आधी आणि कार्यक्रमादरम्यान ‘एक्स्टसी’च्या गोळ्यांचे सेवन केले असावे, असा संशय आहे. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले; त्यानंतर त्यातील एकाला उपनगरातील रुग्णालयात, तर दुसऱ्याला दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघांचाही १२ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजनाशी संबंधित दोन एमबीए विद्यार्थी आणि अमली पदार्थ पुरवठादार अशा पाच जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या मित्रांकडे चौकशी केली असता, त्यांच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांना ‘एक्स्टसी’च्या गोळ्या पुरवल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
लाईव्ह कॉन्सर्टच्या आयोजनाशी संबंधित अन्य तीन व्यक्तींनाही ज्यामध्ये प्रदर्शन स्थळावरील एका वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्याचा समावेश होता, त्यांना अटक करण्यात आली. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळेच कार्यक्रमस्थळी अंमली पदार्थ आणले गेले आणि त्यांचे सेवन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.












