घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाचा खून येरवड्यातील घटना

वैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.गौरव गणेश तेलंगी (वय १८, सध्या रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सयान निजामुद्दीन शेख (वय १८, रा. वैदुवाडी, इंदिरानगर, हडपसर) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (१४ एप्रिल) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरव, त्याचे मित्र रवी कोळी, शाहरुक शेख, रेहान हे दुचाकीवरुन विश्रांतवाडी भागात आले होते. येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात त्यांनी दुचाकी लावली होती.

आरोपींशी गौरव याचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. वादातून आरोपींनी गौरवचा खून करण्याचा कट रचला होता. विश्रांतवाडीतील कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौरव आणि त्याचे मित्र पंचशीलनगर परिसरात लावलेली दुचाकी घेण्यासाठी निघाले होते.आराेपी गौरवच्या मागावर होते. येरवड्यातील काॅमर झोन आयटी कंपनीजवळील रस्त्यावर आरोपींनी गौरवला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.

त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना धमकाविले. आरोपींनी केेलेल्या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें