घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे… म्हणून नराधमाने केला माय लेकीचा विनयभंग

महिला अल्पवयीन मुलगी घरी असताना एका तरुणाने मागील बाजूने घरात प्रवेश करून विवाहिता व तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. दरम्यान महिलेच्या पतीवर विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावात दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या सुमारास एक तरुण दारु पिऊन घराचे पाठीमागे लावलेले पत्र्याचे शेडवरुन उडी मारुन आत आला. त्याने विवाहित महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी केली. त्याचा जाब विचारताच त्याने त्या विवाहितेला शिवीगाळ केली आणि म्हणाला की, “तुझ्या मुलीला माझ्या सोबत लग्न करण्यास सांग.” असे म्हणुन मुलीच्या अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तसेच म्हणाला की, मुलीचे लग्न जर त्याच्या सोबत केले नाही, तर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ती महिला व तिच्या पतीने याचा त्याला जाब विचारला असता त्याने पुन्हा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धारदार विळ्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या तक्रारी वरून आशीष अशोक धिवार याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २१९/२०२६ भा. न्या. सं. ७४, ३५१, ३५१(२), ३५२, ३२९ आणि पोक्सोचे कलम ८, १२, १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें