घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताचा प्रताप, व्यावसायिकाला २ कोटी ४० लाखांना गंडवलं

जमीन खरेदी करून मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपींनी खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून ही रक्कम उकळल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुशील शंकरराव कदम, त्यांची पत्नी नंदा कदम, मुलगा अनिकेत कदम ( तिघेही रा. तळवलकर जिमसमोर, फर्ग्युसन रस्ता, पुणे ) दत्ता केदारी ( रा. बोरज, जि. पुणे ) आणि बाळासाहेब आर. वाळुंज ( रा. कामशेत, ता. मावळ ) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अभिजित विलास उंद्रे ( वय ३५, रा. मांजरी खुर्द, पुणे ) हे व्यावसायिक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कदम हे पुणे पोलीस दलातून सहायक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. डिसेंबर २०१६ ते २१ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी तक्रारदार उंद्रे यांना मुंबईतील बालकिशन गुप्ता यांच्या मालकीची खेड तालुक्यातील बोरज येथील १२ एकर मोक्याची जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.

या जमिनीत गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा होईल, असे आमिष दाखवले.उद्रे यांच्याकडून रक्कम स्वीकारण्यासाठी आरोपींनी बालकिशन गुप्ता यांच्या नावाने खोटे बँक खाते उघडले आणि तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची पे-ऑर्डर घेतली. तसेच सोलापूर येथील एका बँकेत ‘ॲरिस्टोन मल्टीकेअर प्रा. लि.’ या बनावट कंपनीच्या नावाने खाते उघडून २५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यास भाग पाडले.

त्यानंतर विविध कारणे सांगत आणखी ३० लाख रुपये घेतले. खरेदीखत तयार करण्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आले.नंतर आरोपींनी जमीनमालक बालकिशन गुप्ता जिवंत असतानाही ते मृत्यू पावल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलला. जेव्हा तक्रारदाराने पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ केली. पैसे मागण्यासाठी वारंवार गेल्यास गायब करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें