घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार–२०२६” ची घोषणा

पुणे / प्रतिनिधी :मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत या उद्देशाने कार्यरत असलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक वेगळी आणि सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे तसेच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे ही संस्थेची प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्वयंसेवक समाजसेवेत सक्रिय झाले आहेत. कोरोना काळात प्लाझ्मा, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले.

तसेच पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.सध्या संस्थेचे कार्य विविध शहरांमध्ये विस्तारले असून शेकडो स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हेल्प रायडर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कनोजिया म्हणाले की, “समाजात जीव वाचवण्याच्या कार्यात योगदान देणारे, अपघातग्रस्तांना मदत करणारे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा.”महाराष्ट्रासह देशभरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या कार्याची नोंद संस्थेकडे करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी हेल्प रायडर चे समन्वयक अनुपम शहा,बाळासाहेब ढमाले,श्रीकांत कापसे, उपस्थित होते.पुण्यात शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी “संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार–२०२६” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.पुरस्काराचे स्वरूप : ट्रॉफी, सन्मानचिन्ह, शाल आणि नारळ.📞 अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी संपर्क : 9970239999

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें