घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अक्षय तृतीया निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती उत्साहात संपन्न

पुणे (प्रतिनिधी): अक्षय तृतीया या पवित्र सणानिमित्त शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न करण्यात आली. परिसरात सकाळपासूनच धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमासाठी सुंदर सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांमध्ये आरती पार पडली, ज्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

या कार्यक्रमास आमदार भीमराव अण्णा तापकीर, नगरसेवक रोहिदास बापू चोरगे, चोरगे ताई तसेच संजयजी कपिले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यावेळी त्यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती केली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. समाजात एकता, बंधुभाव आणि राष्ट्रभक्ती जपण्याचा संदेश त्यांनी दिला.

विशेषतः युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजासाठी सकारात्मक कार्य करावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.या कार्यक्रमात परिसरातील अनेक नागरिक, महिला, युवक व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी भक्तिभावाने आरतीत सहभाग घेतला आणि सणाचा आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून समाजात धार्मिक भावना वृद्धिंगत होण्याबरोबरच सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें