घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेंदुरजणे येथे संयुक्त जयंती महोत्सव २०२६ चा भव्य सोहळा; चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन(वाई प्रतिनिधी: प्रशांत थोरवे)

वाई तालुक्यातील शेंदुरजणे गावात सामाजिक सलोखा, विचारांची एकता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणारा “संयुक्त जयंती महोत्सव २०२६” यंदा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींच्या जयंतीनिमित्त आयोजित हा महोत्सव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी सकाळी ०५:३० ते ०७:०० या वेळेत ध्यान साधना, सकाळी ०९:०० वा.धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना या पवित्र कार्यक्रमांनी महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वा.महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य व आकर्षक मिरवणूक गावातून काढण्यात येणार असून, त्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे.
शनिवार, दि. २ मे रोजी सायंकाळी ०७:०० ते १०.०० या वेळेत “शिवराय ते भीमराय” या विषयावर प्रा. श्रीकांत बरींगे (अकोला) यांचे प्रेरणादायी जाहीर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री १०:०० ते १२.०० या वेळेत भीम प्रासादिक भजन मंडळाच्या सुमधुर भजनांनी वातावरण भारावून जाणार आहे.
रविवार, दि. ३ मे हा दिवस क्रीडा व संस्कृतीचा संगम ठरणार असून, सकाळी सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सायं. ०७:०० ते ०९:०० या वेळेत सर्वांसाठी स्नेहभोजन (भोजनदान) आयोजित करण्यात आले आहे. तसेच रात्री ०९:३० वा. श्री. अरविंद मोहिते प्रस्तुत मराठी वाद्यवृंद “लोकरंग महाराष्ट्राचा” या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाने रसिकांना सुरेल मेजवानी मिळणार आहे.
सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी ०७.०० ते १०.०० या वेळेत लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची रंगतदार सांगता होणार असून, त्यातून नव्या पिढीला संस्कार व प्रेरणा मिळणार आहे.
या भव्य महोत्सवाचे आयोजन सम्राट अशोक मंडळ, पंचशील महिला मंडळ, सॅम ग्रुप शेंदुरजणे तसेच सम्राट अशोक सामाजिक संस्था, मुंबई (रजि.) व ग्रामस्थ मंडळ शेंदुरजणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी आयोजकांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें